Google Chrome च्या कार्यवाहीयोग्य कोड आवृत्तीस या सेवा अटी लागू होतात. मुक्त स्रोत सॉफ्टवेअर परवाना करारा अंतर्गत http://code.google.com/chromium/terms.html येथे Google Chrome साठी स्रोत कोड विनामूल्य उपलब्ध आहे .
1. आपले Google बरोबरचे संबंध
1.1 आपला Googleची उत्पादने, सॉफ्टवेअर, सेवा आणि वेबसाइट्सचा वापर (या दस्तऐवजात एकत्रितपणे “सेवा” म्हणून संदर्भित आणि Google ने आपल्याला स्वतंत्र लेखी कराराअंतर्गत प्रदान केलेल्या सेवांना वगळून) आपण आणि Google यांच्यातील कायदेशीर कराराचे आधीन आहे. “Google” म्हणजे Google Inc., ज्यांचे व्यवसाय मुख्यालय 1600 Amphitheatre Parkway, Mountain View, CA 94043, United States येथे आहे. हा दस्तऐवज, करार कसा तयार केला जातो आणि त्या कराराच्या काही अटींची उत्पत्ती कशी होते याचे स्पष्टीकरण देतो.
1.2 Google बरोबर अन्यथा लिखित करार होईपर्यंत, Google बरोबरच्या आपल्या करारात नेहमी, या दस्तऐवजात दिलेल्या अटी आणि नियम किमान अंतर्भूत राहतील. या खाली “सार्वत्रिक अटी ” म्हणून उल्लेखित आहेत. Google Chrome स्रोत कोडसाठी मुक्त स्रोत सॉफ्टवेअर परवाना विभक्त लेखी करार तयार करतो. मर्यादित प्रमाणात मुक्त स्रोत सॉफ्टवेअर परवाना या सार्वत्रिक अटींचे स्पष्टपणे अधिग्रहण करतो, Google Chrome किंवा Google Chrome मध्ये विशिष्ट अंतर्भूत घटकांच्या वापरासाठी मुक्त स्रोत परवाना आपला Google बरोबरचा करार विनियमित करतो.
1.3 आपल्या Google बरोबरच्या करारात या सार्वत्रिक अटींच्या अतिरिक्त सेवेसाठी लागू होणार्या कोणत्याही कायदेशीर सूचना अंतर्भूत आहेत. या सर्वांस खाली “अतिरिक्त अटी ” म्हणून उल्लेखित आहेत . अतिरिक्त अटी एखाद्या सेवेवर लागू होतात तेव्हा त्या संबंधित सेवेमध्ये किंवा त्या सेवेच्या वापरातून आपल्याकरिता वाचण्यासाठी प्रवेशयोग्य असतात.
1.4 अतिरिक्त अटींसह सार्वत्रिक अटी आपल्या सेवेच्या वापराच्या संबंधी आपण आणि Google यांच्यात एक कायदेशीर बंधनकारक करार तयार करतात. या अटी सावधपणे वाचण्यासाठी आपण वेळ देणे महत्त्वाचे आहे. एकत्रितपणे, हा कायदेशीर करार खाली “अटी” म्हणून उल्लेखित आहे.
1.5 अतिरिक्त अटी आणि सार्वत्रिक अटी यांच्यात विसंगती आढळल्यास, त्या सेवेच्या संबंधात अतिरिक्त अटींना प्राधान्य दिले जाईल.
2. अटींचा स्वीकार
2.1 सेवा वापरण्यासाठी, आपण प्रथम अटींचा स्वीकार करणे आवश्यक आहे. आपण अटींचा स्वीकार न केल्यास कदाचित आपण ती सेवा वापरू शकणार नाही.
2.2 आपण याद्वारे अटी स्वीकारू शकता:
(अ) अटींचा स्वीकार किंवा सहमतीसाठी क्लिक करणे, जेथे Google ने हा पर्याय आपल्यासाठी कोणत्याही सेवेच्या वापरकर्ता इंटरफेसमध्ये उपलब्ध करून दिला असेल किंवा
(ब) प्रत्यक्ष सेवा वापराद्वारे. या प्रकरणात आपण असे समजून घेता व मान्य करता की आपल्या द्वारे सेवेचा वापर ही त्या क्षणापासून अटींची स्वीकृती असल्याचे Google ग्राह्य धरते.
2.3 आपण सेवा वापरू आणि आणि अटी स्वीकारू शकणार नाही जर (अ) आपण Googleसह करार करण्यासाठी कायदेशीर वयाचे नसाल, किंवा (ब) आपण यूनायटेड स्टेट्स(अमेरिका) किंवा आपला निवासी देश वा आपण जेथून सेवेचा वापर करता त्या देशासह इतर देशाच्या कायद्यांतर्गत ही सेवा प्राप्त करण्यासाठी प्रतिबंधित असाल
2.4 पुढे जाण्यापूर्वी, आपण आपल्या रेकॉर्ड्ससाठी या सार्वत्रिक अटी मुद्रित केल्या किंवा त्यांची स्थानिक प्रत जतन केली पाहिजे.
3. अटींची भाषा
3.1 Google ने आपल्याला अटींच्या इंग्रजी भाषेच्या आवृत्तीचे भाषांतर प्रदान केल्यानंतर आपण मान्य करता की, हे भाषांतर केवळ आपल्या सोयीसाठी प्रदान केले आहे आणि अटींची इंग्रजी भाषेची आवृत्ती Google बरोबर आपले संबंध विनियमित करेल.
3.2 अटींच्या इंग्रजी भाषेच्या आवृत्तीत आणि भाषांतरात कोणतीही विसंगती असल्यास इंग्रजी भाषेच्या आवृत्तीस प्राधान्य दिले जाईल.
4. Google द्वारा सेवांच्या तरतूदी
4.1 जगभरात Google च्या कायद्याने अस्तित्वात असलेल्या सहाय्यक आणि संबद्ध कंपन्या आहेत (“सहाय्यक आणि संबद्ध कंपन्या”). काहीवेळा या कंपन्या Google च्या वतीने आपल्याला सेवा प्रदान करतात. आपण स्वीकार करता आणि सहमत आहात की सहाय्यक आणि संबद्ध कंपन्यांना आपल्याला सेवा प्रदान करण्याचा अधिकार आहे.
4.2 Google आपल्या वापरकर्त्यांना शक्य तितका सर्वोत्कृष्ट अनुभव देण्यासाठी सतत परिवर्तनशील आहे. आपण स्वीकार करता आणि सहमत आहात की Google आपल्याला ज्या स्वरूप आणि प्रकारच्या सेवा प्रदान करते त्या वेळोवेळीपूर्वसूचनेशिवाय बदलल्या जाऊ शकतात.
4.3 या सतत परिवर्तनाचा एक भाग म्हणून, की Google सामान्यत: आपल्या विवेकबुद्धीनुसार, पूर्व सूचनेशिवाय आपल्याला किंवा वापरकर्त्यांना सेवा (किंवा सेवेतील कोणतेही वैशिष्ट्य) प्रदान करणे थांबवू (स्थायी किंवा तात्पुरते) शकते याचा आपण स्वीकार करता आणि सहमत आहात. आपण सेवा वापरणे कधीही थांबवू शकता. आपण सेवा वापरणे थांबवता तेव्हा आपण Google ला त्याची विशेष माहिती देण्याची आवश्यकता नाही.
4.4 आपण स्वीकार करता आणि सहमत आहात की जर Google ने आपले खाते प्रवेशास अक्षम केले तर, आपण आपल्या सेवेमध्ये, आपल्या खात्याच्या तपशीलात किंवा आपल्या खात्यावरील कोणत्याही फाइल्स किंवा इतर सामग्रीमध्ये प्रवेश करण्यास प्रतिबंधित असू शकता.
4.5 आपण स्वीकार करता आणि सहमत आहात की Google ने सध्या सेवेच्या माध्यमातून प्रसारणे पाठवण्याची आणि प्राप्त करण्याची किंवा कोणत्याही सेवेसाठी आपण वापरत असलेल्या संचय स्थानाची निश्चित कमाल मर्यादा सेट केलेली नाही परंतु Google कोणत्याही वेळी Google च्या अधिकारांतर्गत यास सेट करू शकते.
5. आपल्याद्वारे सेवांचा वापर
5.1 काही सेवांमध्ये प्रवेश करण्यासाठी आपल्याला सेवेसाठी नोंदणी प्रक्रियेचा एक भाग म्हणून किंवा सेवेचा वापर सुरू ठेवण्याचा एक भाग म्हणून स्वत:बद्दल काही माहिती (परिचय किंवा संपर्क तपशील यासारखी), प्रदान करावी लागू शकेल. आपण Google ला दिलेली कोणतीही नोंदणी माहिती नेहमी अचूक, योग्य आणि अत्याधुनिक असेल याचेशी आपण सहमत आहात.
5.2 आपण केवळ (अ) अटी आणि (ब) संबंधित न्यायाधिकारक्षेत्रातील कोणताही लागू कायदा, नियम, किंवा सामान्यत: स्वीकृत कार्यपर्णाली किंवा मार्गदर्शक तत्त्वे याग्वारे अनुमत उद्देशांसाठी (अमेरिका किंवा इतर संबंधित देशांकडून आणि त्यांना डेटा किंवा सॉफ्टवेअर निर्यात करण्यासंबंधी कोणत्याही कायद्यासह)सेवा वापरण्यास सहमत आहात.
5.3 आपण सहमत आहात की आपण कोणत्याही सेवेत Google ने आपल्याला प्रदान केलेल्या इंटरफेस व्यतिरिक्त, Google बरोबर एका स्वतंत्र करारामध्ये आपल्याला निर्दिष्टपणे अशी परवानगी दिली जात नाही तोपर्यंत कोणत्याही इतर मार्गाने प्रवेश (किंवा प्रवेश करण्याचा प्रयत्न) करणार नाही. आपण निश्चितपणे सहमत आहात की आपण कोणत्याही सेवेत कोणत्याही ऑटोमेटेड माध्यमातून (लिपी किंवा वेब क्रॉलरच्या वापरासह) प्रवेश करणार नाही (किंवा प्रवेशाचा प्रयत्न करणार नाही) आणि आपण सेवेवर असलेल्या कोणत्याही रोबोट्स txt फाइलमध्ये सेट केलेल्या निर्देशांचे पालन करणार असल्याचे सुनिश्चित करता.
5.4 आपण सहमत आहात की आपण सेवेमध्ये (किंवा सेवेशी कनेक्टेड सर्व्हर आणि नेटवर्क मध्ये) अडथळा किंवा अव्यवस्था निर्माण करणार्या कोणत्याही क्रियाकलापात गुंतलेले नसाल.
5.5 Google कडून स्वतंत्र कराराद्वारे आपल्याला असे करण्याची परवानगी दिली जात नाही तोपर्यंत, आपण सहमत आहात की आपण कोणत्याही हेतूसाठी सेवेचे पुनरूत्पादन, डुप्लिकेट, कॉपी, विक्री, व्यापार किंवा पुनर्विक्री करणार नाही.
5.6 आपण सहमत आहात की अटींच्या अंतर्गत आपण केलेला कर्तव्य भंग आणि त्याच्या परिणामांसाठी (कोणत्याही प्रकारची हानी किंवा क्षति जी Google ला भोगावी लागू शकेल तिच्यासह) आपण स्वत: पूर्णपणे जवाबदार असाल (आणि Google आपण किंवा कोणत्याही तृतीय पक्षासाठी जवाबदार राहणार नाही)
6. आपले संकेतशब्द आणि खाते सुरक्षितता
6.1 आपण सहमत आहात आणि समजून घेतले आहे की आपण सेवेत प्रवेश करण्यासाठी वापरत असलेल्या कोणत्याही खात्याशी संबंधित संकेतशब्द गुप्त राखण्यासाठी आपण स्वत:च जवाबदार आहात.
6.2 त्याचबरोबर, आपण सहमत आहात की आपल्या खात्याअंतर्गत घडणार्या सर्व कार्यकलापांसाठी आपण Google ला पूर्णपणे जवाबदार असाल.
6.3 जर आपल्या संकेतशब्दाचा किंवा खात्याचा गैरवापर होत असल्याचे आपल्या निदर्शनास आले तर, आपण Google ला http://www.google.com/support/accounts/bin/answer.py?answer=48601 येथे त्वरित सूचित करण्यास सहमत आहात.
7. गोपनीयता आणि आपली वैयक्तिक माहिती
7.1 Googleच्या डेटा संरक्षण पद्धतींबद्दल माहिती मिळवण्यासाठी, कृपया Google चे गोपनीयता धोरण http://www.google.com/privacy.html येथे वाचा. आपण सेवा वापरता तेव्हा Google आपली वैयक्तिक माहिती कशी हाताळते आणि आपली गोपनीयता कशा प्रकारे संरक्षित करते हे, हे धोरण स्पष्ट करते.
7.2 आपण आपला डेटा Google च्या गोपनीयता धोरणांनुसारच वापरण्यास सहमत आहात.
8. सेवेतील सामग्री
8.1 आपण समजून घेतले आहे की आपण सेवेच्या वापराचा एक भाग म्हणून किंवा सेवेच्या वापराद्वारे प्रवेश केलेली सर्व माहिती (डेटा फाइल्स, लिखित मजकूर, संगणक सॉफ्टवेअर, संगीत, ऑडिओ फाइल्स किंवा इतर ध्वनी, फोटोग्राफ, व्हिडिओ किंवा इतर प्रतिमा यासारखी) ची संपूर्ण जबाबदारी त्या व्यक्तीची आहे जिने अशी सामग्री तयार केली आहे. अशी सर्व माहिती खाली “सामग्री” म्हणून उल्लेखित आहे .
8.2 आपल्याला ज्ञात असले पाहिजे की सेवांचा भाग म्हणून आपल्यासमक्ष सेवेतील जाहिराती आणि आणि सेवेतील प्रायोजित सामग्री सह प्रस्तुत सामग्री, परंतु या इतकेच मर्यादित नाही, बौद्धिक संपत्ती अधिकारांद्वारे संरक्षित असू शकेल जे Google ला ही सामग्री प्रदान करणार्या प्रायोजक किंवा जाहिरातदारांच्या (किंवा त्यांच्या वतीने अन्य व्यक्ती किंवा कंपनीच्या) मालकीचे असतील. Google किंवा त्या सामग्रीच्या मालकाकडून स्वतंत्र कराराद्वारे आपणांस असे करण्याची स्पष्ट परवानगी प्राप्त झालेली नसेल तोपर्यंत आपण ममध्ये सुधारणा करू, ती भाड्याने, भाडेपट्टीने देऊ, तीवर कर्ज देऊ, तिची विक्री, वितरण किंवा त्या सामग्रीवर (संपूर्ण किंवा आंशिक) आधारित व्युत्पन्न कार्ये तयार करू शकत नाही.
8.3 Google कोणत्याही सेवेतील सर्व किंवा कोणतीही सामग्री प्री-स्क्रीन्, समीक्षा, ध्वजांकित, फिल्टर, सुधारणा, नामंजूर किंवा काढून टाकण्याचे अधिकार राखून ठेवत आहे(परंतु बंधनकारक नाही). काही सेवांसाठी, Google विशिष्ट लैंगिक सामग्री फिल्टर करण्यासाठी साधने उपलब्ध करुन देऊ शकते. या साधनांमध्ये SafeSearch प्राधान्य सेटिंग्जचा समावेश असतो (पहा http://www.google.com/help/customize.html#safe). या व्यतिरिक्त, येथे व्यावसायिक रूपात उपलब्ध अशा सेवा आणि सॉफ्टवेअर आहेत ज्या आपल्यास आपत्तीजनक वाटणार्या सामग्रीच्या प्रवेशावर मर्यादा घालू शकतात.
8.4 आपण समजून घेता की सेवा वापराद्वारे आपण असा सामग्रीस सामोरे जाल जी आपल्याला अपमानकारक, असभ्य किंवा आपत्तीजनक वाटू शकते, त्या संदर्भात, आपण स्वत:च्या जोखमीवर या सेवांचा वापर करीत आहात.
8.5 आपण सहमत आहात की सेवांचा वापर करताना आपण तयार, प्रसारित किंवा प्रदर्शित केलेल्या सामग्रीसाठी आणि तसे करण्यामुळे उद्भवणार्या सर्व परिणामांसाठी (Google ला भोगाव्या लागणार्या कोणत्याही हानी किंवा क्षतिसह) आपण संपूर्णतः जबाबदार आहात (आणि याकरिता Google आपल्यासाठी किंवा कोणत्याही तृतीय पक्षासाठी जबाबदार राहाणार नाही)
9. मालकी हक्क
9.1 आपण स्वीकार करता आणि सहमत आहात की सेवांमध्ये आस्तित्वात असलेल्या कोणत्याही बौद्धिक संपत्ती अधिकारांसहित (ते अधिकार नोंदणीकृत असले किंवा नसले आणि जगात कोठेही अस्तित्वात असले तरीही) सेवांमधील आणि सेवांकडे असलेले सर्व कायदेशीर अधिकार, अभिधान आणि हित Google कडे (किंवा Google च्या परवाना प्रदात्यांकडे) राहतील. आपण यापुढे स्वीकारता की सेवांमध्ये अशी माहिती असू शकते जी Google द्वारे गोपनीय म्हणून स्पष्ट केलेली असू शकेल आणि Google च्या अग्रिम लिखित संमतीशिवाय अपण अशा प्रकारची माहिती व्यक्त करणार नाही.
9.2 जोपर्यंत Google कडून आपणास अन्यथा लिखित अधिकृतता देण्यात येत नाही या अटींमधील काहीही आपल्याला Google ची ट्रेडनेम, ट्रेडमार्क, सेवा चिन्हे, लोगो, डोमेन नावे, आणि इतर सुस्पष्ट ब्रँड वैशिष्ट्ये वापरण्याचा अधिकार देत नाही याचेशी आपण सहमत आहात.
9.3 या ब्रँड वैशिष्ट्यांमधील कशाच्याही वापरासाठी Google ने आपल्याला एखाद्या स्वतंत्र लिखित करारानुसार स्पष्ट अधिकार दिल्यानंतर आपण स्वीकारता की आपण या कोणत्याही वैशिष्ट्याचा वापर करण्यासाठी त्या कराराचे, अटींमध्ये नमूद लागू तरतूदी आणि वेळोवेळी Google च्या ब्रँड सुविधांच्या वापराबाबत अद्यतनित मार्गदर्शक तत्त्वांचे पालन कराल. ही मार्गदर्शक तत्त्वे http://www.google.com/permissions/guidelines.html येथे ऑनलाइन पाहता येतील (किंवा Google ने या कारणास्तव वेळोवेळी प्रदान केलेल्या अशा अन्य URL शोधा).
9.4 पुढे कलम 11 मध्ये दिलेल्या मर्यादित परवान्याव्यतिरिक्त, Google स्वीकार करते आणि सहमत आहे या अटींअंतर्गत सामग्रीमध्ये आस्तित्वात असलेल्या कोणत्याही बौद्धिक संपत्ती अधिकारांसहित (ते अधिकार नोंदणीकृत असले किंवा नसले आणि जगात कोठेही अस्तित्वात असले तरीही) आपण सेवेवर किंवा सेवेद्वारे सादर, पोस्ट, प्रसारित किंवा प्रदर्शित केलेल्या कोणत्याही सामग्रीचा आपला अधिकार, अभिधान आणि हित Google ला प्राप्त होत नाहीत. आपण स्वीकारले आहे किंवा Google कडून लिखित सहमती असल्याशिवाय आपण सहमत आहात की आपण त्या अधिकारांचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांना अंमलात आणण्यासाठी स्वत: जवाबदार आहात आणि आपल्या वतीने तसे करणे Google ला बंधनकारक नाही..
9.5 आपण स्वीकारत आहात की सेवांसह जोडलेल्या किंवा सेवांमध्ये असलेल्या कोणत्याही प्रकारच्या मालकी हक्क सूचना (कॉपीराइट आणि ट्रेडमार्क सूचनांसहित), आपण काढू, अस्पष्ट करू किंवा बदलू शकत नाही.
9.6 आपण स्वीकारत आहात की Google द्वारा आपल्याला असे करण्यासाठी स्पष्ट लिखित अधिकृतता दिली जात नाही तोपर्यंत सेवा वापरताना आपण कोणताही ट्रेडमार्क, सेवा चिह्न, ट्रेड नेम, कोणत्याही कंपनीचा किंवा संघटनेच्या लोगो यांचा वापर अशा प्रकारे करणार नाही जो अशी चिन्हे, नावे किंवा लोगो यांचे अधिकृत मालक किंवा वापरकर्ते यांचेविषयी संदिग्धता निर्माण करेल.
10. Google द्वारा परवाना
10.1 Google द्वारा प्रदान केलेल्या सेवेचा भाग म्हणून Google द्वारा आपल्यास प्रदान केले गेलेले सॉफ्टवेअर (खाली “सॉफ्टवेअर” म्हणून उल्लेखित) वापरण्यासाठी Google आपणास वैयक्तिक, सार्वभौम, विनामानधन, अनिश्चित आणि एकाधिकार नसलेला परवाना देते. या परवान्याचा एकमात्र उद्देश, अटींद्वारे अनुमत पद्धतींनुसार Google द्वारे प्रदान केल्या जाणार्या सेवांचे लाभ वापरण्यासाठी आणि त्यांचा आनंद घेण्यासाठी आपल्याला सक्षम करणे हा आहे.
10.2 जो पर्यंत अशी स्पष्ट परवानगी नसेल किंवा कायद्याने आवश्यक नसेल किंवा Google ने लिखित रुपात असे करण्यासाठी स्पष्टपणे सांगितलेले नसेल तोपर्यंत, आपण सॉफ्टवेअर किंवा त्याच्या कोणत्याही भागाची कॉपी, ,संशोधन, त्यांचे व्युत्पन्न कार्य, विरुद्ध अभियांत्रिकी कार्य, डिकंपाइल किंवा स्रोत कोड काढण्याचा अन्यथा प्रयत्न करू शकत नाही. (किंवा आपण असे करण्याची कोणालाही परवानगीही देऊ शकत नाही)
10.3 जोपर्यंत Google आपल्याला असे करण्याची विशिष्ट लिखित परवानगी देत नाही तोपर्यंत, आपण आपले सॉफ्टवेअरच्या वापराचे अधिकार नियुक्त करू (किंवा त्यांचा उप-परवाना देऊ), आपल्या सॉफ्टवेअर वापराच्या अधिकारांतील किंवा वरील सुरक्षेचा हिस्सा मान्य करू किंवा आपले सॉफ्टवेअर वापराचे अधिकार किंवा त्यातील काही भाग अन्यथा हस्तांतरित करू शकत नाही.
11. आपल्याकडून सामग्री परवाना
11.1 आपण सेवांवर किंवा सेवेद्वारे सबमिट, पोस्ट किंवा प्रदर्शित केलेल्या सामग्रीतील कॉपीराइट आणि इतर कोणतेही अधिकार आपल्याकडेच राहतील.
12. सॉफ्टवेअर अद्यतने
12.1 आपण जे सॉफ्टवेअर वापरता ते Google द्वारे वेळोवेळी मिळत असलेली अद्यतने स्वयंचलितपणे डाउनलोड आणि स्थापित करू शकेल. या अद्यतनांची रचना सेवेतील सुधारणा, वृद्धी, आणि भावी विकासासाठी करण्यात येते आणि ती बग निराकरण, वर्धित कार्यक्षमता, नवीन सॉफ्टवेअर मॉड्यूल, आणि संपूर्ण नवीन आवृत्ती अशा कोणत्याही स्वरूपात असू शकेल. आपण या सेवांच्या वापराचा एक भाग म्हणून अद्यतनांच्या प्राप्तीचा (आणि Google ला ते आपल्याला वितरित करण्याच्या परवानगीचा) स्वीकार करीत आहात.
13. Google आणि आपल्यातील संबंधांची समाप्ती
13.1 आपण किंवा Google मधील कोणाही द्वारे करार समाप्त करेपर्यंत निम्नलिखितप्रमाणे सेवा अटी लागू राहतील.
13.2 आपण Google आणि आपल्यातील कायदेशीर करार निरस्त करू इच्छित असल्यास आपण असे (अ) कोणत्याही वेळी Google ला सूचित करून आणि (ब) जेथे Google ने आपल्यासाठी हा पर्याय उपलब्ध करून दिला आहे तेथे आपण वापरात असलेल्या सर्व सेवांसाठी असलेली आपली खाती बंद करुन करू शकता. आपली सूचना या अटींच्या सुरवातीस दिलेल्या Googleच्या पत्त्यावर लिखित स्वरूपात प्रेषित केली पाहिजे.
13.3 Google आपल्याबरोबरचा हा कायदेशीर करार केव्हाही समाप्त करू शकेल जर:
(अ) आपण अटींमधील कोणत्याही तरसूदीचा भंग केला (किंवा अशा कोणत्याही प्रकारचे वर्तन जे स्पष्ट करते की आपला हेतू तसा नव्हता, किंवा आपण नमूद अटी परिपूर्ण करण्यात अक्षम असाल तर); किंवा
(ब) Google ला कायद्याने असे करणे आवश्यक असेल (उदाहरणार्थ, सेवेतील तरतूदी आपल्यासाठी, किंवा बेकायदेशीर होत असतील तर); किंवा
(क) Google आपल्यास ज्या भागीदारांमार्फत सेवा देत आहे त्यांनी Google सह आपले संबंध संपवले किंवा आपल्याला सेवा देणे थांबविले तर; किंवा
(ड) Google ने आपण ज्या देशाचे निवासी आहात किंवा जेथून सेवांचा उपयोग करीत आहात, त्या देशात सेवा प्रसारित करणे बंद केले; किंवा
(इ) Google आपल्याला देत असलेल्या सेवेतील तरतूदी Google’ च्या मतानुसार, यापुढे वाणिज्यिक दृष्टीने व्यवहार्य नसतील तर.
13.4 या कलमातील काहीही अटींमधील कलम 4 अंतर्गत सेवा तरतूदींमधील Googleचे अधिकार प्रभावित करू शकणार नाही.
13.5 जेव्हा या अटी समाप्त होतात, सर्व कायदेशीर अधिकार, कर्तव्ये आणि दायित्वे ज्यापासून आपण आणि Google लाभान्वित झाले असाल, त्या (किंवा अटी लागू झाल्यानंतर त्याद्वारे अस्तित्वात आलेल्या) किंवा ज्या अनिश्चित कालावधीपर्यंत लागू रहाण्यास स्पष्ट प्रस्तावित आहेत त्या या विरामापश्चात अप्रभावित राहतील आणि परिच्छेद 20.7 मधील तरतूदींद्वारे अधिकार, करार आणि दायित्वे अनिश्चित कालावधीपर्यंत लागू राहू शकतील.
14. हमी बाह्यता
14.1 कलम १४ व १५ सह या अटींमध्ये असे काहीही नाही, जे GOOGLE ला कोणतेही नुकसान, जे कदाचित कायद्याच्या बाहेरील किंवा लागू कायद्याच्या मर्यादेत असेल, ची हमी किंवा दायित्व नाकारते किंवा मर्यादित करते. काही अधिकार क्षेत्रे काही विशिष्ट हमी किंवा शर्ती किंवा मर्यादा वगळण्यास किंवा निष्काळजीपणा, कराराचे उल्लंघन किंवा लागू अटींचे उल्लंघन केल्याने होणारे नुकसान किंवा हानी किंवा आकस्मिक किंवा परिणामस्वरुप नुकसानासाठी, दायित्व नाकारण्याची परवानगी देत नाहीत. त्यानुसार केवळ आपल्या अधिकार क्षेत्रात असलेल्या कायद्याच्या मर्यादा आपल्यावर लागू होऊ शकतील आणि आमचे दायित्व त्या कायद्याच्या महत्तम परवानगी प्राप्त सीमेइतकी मर्यादित राहिल.
14.2 आपल्याला स्पष्टपणे समजले आहे आणि आपण स्वीकार करता की आपला सेवांचा वापर आपल्या स्वत:च्या जोखमीवर आहे आणि प्रदान करण्यात आलेल्या सेवा "जशा आहेत तशा"; आणि “जशा उपलब्ध आहेत तशा&rdquo आहेत.
14.3 विशेषत: GOOGLE, त्यांच्या सहाय्यक आणि संबद्ध कंपन्या आणि त्यांचे परवाना प्रदाते कोणत्याही प्रकारचे प्रतिनिधित्व करीत नाहीत किंवा आपल्याला हमी देत नाहीत की:
(अ) आपला सेवा वापर आपल्या आवश्यकतांची पूर्ती करेल,
(ब) आपला सेवा वापर विनाव्यत्यय, वेळेवर, सुरक्षित किंवा त्रुटीमुक्त असेल,
(क) सेवांचा वापर केल्याच्या परिणामस्वरुपी आपण मिळवलेली कोणतीही माहिती अचूक आणि विश्वासार्ह असेल, आणि
(ड) सेवेचा भाग म्हणून प्रदान करण्यात आलेल्या कोणत्याही सॉफ्टवेअरचे कार्य किंवा कार्यक्षमतेतील दोष सुधारले जातील.
14.4 सेवा वापराद्वारे डाउनलोड केलेली किंवा अन्यथा मिळवलेली सामग्री आपली स्वत:ची विवेकबुद्धी आणि जोखमीवर राहिल आणि अशा कोणत्याही सामग्रीच्या डाउनलोड द्वारे आपल्या संगणक प्रणालीचे किंवा इतर डिव्हाइसचे नुकसान झाल्यास किंवा डेटा हानी झाल्यास त्यासाठी आपण स्वत: संपूर्णपणे जबाबदार असाल.
14.5 आपल्या द्वारे GOOGLE मधून किंवा त्यांच्या सेवांमधून, मिळवलेली मौखिक किंवा लिखित, अशी कोणतीही सूचना किंवा माहिती, जी अटींमध्ये स्पष्टप नसेल तिची कोणतीही हमी तयार होऊ शकणार नाही.
14.6 या उपरांत GOOGLE त्या सर्व प्रकारच्या हमी आणि अटी स्पष्टपणे अस्वीकृत करत आहे, ज्या स्पष्ट किंवा निहीत, या सहित परंतु व्यापारीतेस लागू निहित हमी आणि अटीं इतक्याच मर्यादित नाहीत तर, कोणत्याही विशिष्ट उद्देशाच्या पूर्ततेसाठी आणि उल्लंघन करु नये अशा देखील आहेत.
15. उत्तरदायित्वाच्या मर्यादा
15.1 उपरोक्त परिच्छेद 14.1 मधील तरतुदीनुसार आपण स्पष्टपणे समजून घेत आणि स्वीकार करीत आहात की GOOGLE, त्यांच्या सहाय्यक आणि संबद्ध कंपन्या, त्यांचे परवानाप्रदाते याकरिता आपल्यासाठी जवाबदार राहणार नाहीत:
(अ) कोणत्याही उत्तरदायित्व सिद्धांतामुळे वा त्याअंतर्गत उद्भवलेली कोणतीही प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, आकस्मिक, विशिष्ट परिणामस्वरुप किंवा उदाहरणस्वरुप हानी चे उत्तरदायित्व आपले असू शकेल. यामध्ये कोणत्याही प्रकारची नफ्यातील हानी (प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष उद्भवलेली), पत किंवा व्यापारी प्रतिष्ठेची कोणत्याही प्रकारची हानी, सोसावी लागलेली डेटा हानी, बदली माल किंवा सेवांची अधिप्राप्ती किंवा इतर असूर्त हानी;अंतर्भूत आहेत परंतु इतकेच मर्यादित नाही;
(ब) आपल्यामुले उद्भवलेली कोणतीही हानी किंवा क्षति सहित परंतु याकरिता परिणामस्वरुप होणारी हानी किंवा नुकसान इतकेच मर्यादित नाही:
(I) आपल्याकडून जाहिरातीची पूर्णता, अचूकता किंवा अस्तित्वावर केला जाणारा विश्वास किंवा आपण आणि जाहिरातदार किंवा प्रायोजक ज्यांच्या जाहिराती सेवांवर प्रदर्शित होतात यांच्यातील कोणत्याही प्रकारच्या संबंधांमुळे किंवा व्यवहारमुळे;
(II) GOOGLE द्वारा सेवेत करण्यात आलेले कोणतेही बदल, किंवा सेवांमध्ये किंवा सेवांच्या अंतर्गत कोणत्याही वैशिष्ट्यामध्ये करण्यात आलेल्या कोणत्याही कायम स्वरुपाच्या किंवा अस्थायी स्वरुपाचे प्रतिबंधासाठी);
(III) आपल्या सेवांच्या वापराद्वारे किंवा त्यादरम्यान प्रसारित कोणतीही सामग्री आणि राखलेला इतर संचार डेटा हटवणे, भ्रष्ट करणे किंवा संचयित करण्यात बिघाड होणे;
(IV) आपण GOOGLE ला अचूक खाते माहिती देण्यात अयशस्वी ठरल्यास;
(V) आपण आपला संकेतशब्द आणि खात्याचे तपशील सुरक्षित आणि गोपनीय ठेवण्यात अयशस्वी ठरल्यास;
15.2 उपरोक्त परिच्छेद क्र.15.1 मधील GOOGLE च्या आपल्याकरिता उत्तरदायित्वावरील मर्यादा GOOGLE ने त्यासाठी सल्ला दिला असेल वा नसेल किंवा कोणत्याही प्रकारचे नुकसान उद्भवण्याच्या शक्यतांविषयी आपण जागरूक असलात वा नाही तरीही लागू होतील.
16. कॉपीराइट आणि ट्रेडमार्क धोरणे
16.1 कोणत्याही लागू आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपत्ती कायद्या (यूनायटेड स्टेट्समधील, Digital Millennium Copyright Act सह) अंतर्गत येणार्या कॉपीराइट उल्लंघनाचे आरोपांच्या सूचनांना प्रत्युत्तर देण्याचे आणि वारंवार उल्लंघन करणार्या खात्यास बंद करण्याचे Google चे धोरण आहे. Google’ च्या धोरणांचे तपशील http://www.google.com/dmca.htmlयेथे मिळू शकतील.
16.2 Google त्यांच्या जाहिरात उद्योगांच्या संदर्भात एक ट्रेडमार्क तक्रार प्रक्रिया चालवते, ज्याचा तपशील आपल्याला http://www.google.com/tm_complaint.html येथे मिळू शकेल.
17. जाहिराती
17.1 काही सेवा जाहिरातींच्या महसूलाने समर्थित असतात आणि जाहिराती आणि प्रचारसामग्री प्रदर्शित करू शकतात. या जाहिराती सेवेवर संचयित माहितीमधील सामग्री, सेवेद्वारे केलेल्या क्वेरी किंवा इतर माहिती वर लक्ष्यित असू शकतात.
17.2 Google द्वारा सेवेवर केल्या जाणार्या जाहिरातींच्या पद्धती, मोड आणि मर्यादा आपल्याला कोणतीही विशेष सूचना न देता बदलल्या जाऊ शकतात.
17.3 Google द्वारे आपल्याला सेवेत प्रवेश आणि वापरास मंजूरी मोबदल्यात आपण सहमत आहात की Google अशा जाहिराती सेवेवर देऊ शकते.
18. इतर सामग्री
18.1 सेवांमध्ये इतर वेबसाइट्स किंवा सामग्रीच्या संसाधनांच्या हायपरलिंक्स असू शकतात. Google व्यतिरिक्त इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्तीने प्रदान केलेल्या अशा कोणत्याही वेबसाइट किंवा संसाधनांवर Google चे नियंत्रण नसू शकेल.
18.2 आपल्याला ज्ञात आहे आणि आपण मान्य करता की Google अशा कोणत्याही बाह्य साइट किंवा संसाधनांच्या उपलब्धतेसाठी जबाबदार नाही आणि अशा कोणत्याही वेबसाइट किंवा संसाधनावरील किंवा त्यांच्या तर्फे असलेल्या कोणत्याही जाहिराती, उत्पादने, किंवा इतर सामग्रीची पुष्टी करत नाही.
18.3 आपल्याला ज्ञात आहे आणि आपण मान्य करता की अशा कोणत्याही बाह्य साइट किंवा संसाधनांच्या उपलब्धतेमुळे आपल्याद्वारे उद्भवणार्या किंवा अशा वेबसाइट वा संसाधनांवर वा मध्ये उपलब्ध कोणतीही जाहिरात, उत्पादन किंवा सामग्रीची पूर्णता, अचूकता वा अस्तित्व यावर आपण ठेवलेल्या विश्वासामुळे उद्भवणार्या कोणत्याही हानी वा क्षतिकरिता Google उत्तरदायी नाही.
19. अटींमधील बदल
19.1 Google वेळोवेळी त्यांच्या सार्वभौम अटी आणि अतिरिक्त अटींमध्ये बदल करू शकते. जेव्हा असे बदल केले जातात तेव्हा, त्या सार्वभौम अटींची एक नवीन प्रत Google http://www.google.com/accounts/TOS?hl=en येथे उपलब्ध करून देते आणि कोणत्याही नवीन अतिरिक्त अटी आपल्याला प्रभावित सेवेद्वारे, किंवा तिच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या जातील.
19.2 आपण समजून घेता आणि स्वीकार करता की ज्या तारखेला या सार्वभौम अटी किंवा अतिरिक्त अटी बदलल्या जातील त्यानंतर आपण सेवांचा वापर केल्यास, आपण त्या सार्वभौम अटी किंवा अतिरिक्त अटींचा स्वीकार केला असल्याची वागणूक Google आपल्याला देईल.
20. सामान्य कायदेशीर अटी
20.1 काहीवेळा जेव्हा आपण सेवा वापरता तेव्हा, आपण (परीणामस्वरुप, किंवा आपल्या सेवा वापराद्वारे) एखादी सेवा वापरू किंवा सॉफ्टवेअरचा एखादा भाग डाउनलोड करू किंवा एखाद्या मालाची खरेदी करू शकता, जे कोणी इतर व्यक्ती किंवा कंपनीद्वारा प्रदान करण्यात आलेले असतात. आपला या इतर सेवा, सॉफ्टवेअर किंवा मालाचा वापर त्यांचेशी संबंधित असलेल्या इतर व्यक्ति किंवा कंपनी आणि आपण यांच्यातील विशिष्ट स्वतंत्र अटींचा विषय आहेत. असे असल्यास, या अटी, आपण आणि इतर व्यक्ती किंवा कंपनी यांच्या दरम्यान असलेले कायदेशीर संबंध प्रभावित करणार नाहीत.
20.2 या अटी आपण आणि Google मधील संपूर्ण कायदेशीर कराराची रचना करतात आणि सेवांच्या वापराचे संचालन करतात (परंतु, Googleद्वारा आपल्याला स्वतंत्र लिखित कराराअंतर्गत प्रदान करीत असलेल्या काही सेवांव्यतिरिक्त) आणि सेवांच्या संबंधात आपण आणि Google यांच्यातील आधीच्या कोणत्याही करारास संपूर्णतः पुनर्स्थित करतात.
20.3 आपण स्वीकारता की Google आपल्याला ई-मेल, नियमित मेल, किंवा सेवेवर पोस्ट करून अटींतील बदलासंबंधी सूचनांसह सूचना उपलब्ध करुन देईल.
20.4 आपण स्वीकार करता की जर अटीतील कोणत्याही कायदेशीर अधिकारांची किंवा उपायांची अंमलबजावणी Google करत नसेल तर (किंवा ज्यामुळे कोणत्याही लागू कायद्याखाली Google ला काही फायदा होत असेल) यांस Google च्या हक्कांमध्ये व्यावहारिक सूट असल्याचे मोजण्यात येणार नाही आणि ते ृहक्क किंवा उपाय तरीही Google वर उपलब्ध राहतील.
20.5 जर कोणत्याही कायदेशीर न्यायालयाने, ज्याला या प्रकरणावर निकाल देण्याचा अधिकार आहे ने निश्चित केले की या अटींमधील काही तरतूदी अवैध आहेत तर, त्या नंतर इतर अटींवर कोणताही परिणाम न करता त्या तरतूदी अटींमधून काढण्यात येतील. अटींमधील उर्वरित तरतूदी तशाच वैध आणि अंमलात आणण्यायोग्य राहतील.
20.6 आपण हे मान्य करता आणि स्वीकारता की कंपन्यांच्या समूहाचा प्रत्येक सदस्य, ज्याची पालक कंपनी Google आहे, ती या अटींसाठी तृतीय पक्षाच्या सुविधा घेणारा असेल आणि अशा इतर कंपन्या त्यांना लाभदायक (किंवा त्यांच्या पक्षातील अधिकारांवर) अटींमधील तरतूदींची थेट अंमलबजावणी करण्यास आणि त्यांचेवर निर्भर राहण्यास पात्र असतील. या व्यतिरिक्त, कोणतीही इतर व्यक्ती किंवा कंपनी अटींनुसार तृतीयपक्ष सुविधा घेणारी नसेल.
20.7 या अटी आणि या अटींच्या अंतर्गत आपण व Google यांच्यातील संबंध यांचे संचालन त्यांच्या कायदेशीर तरतूदींचे संघर्ष कोठेही असले तरीही State of Californiaच्या कायद्यान्वये केले जाईल. आपण आणि Google स्वीकार करता की अटींद्वारे उद्भवलेल्या कोणत्याही कायदेशीर प्रकरणाच्या निराकरणासाठी Santa Clara, California अंतर्गत स्थित न्यायालयाच्या एकाधिकार अधिकार क्षेत्रातच प्रकरण सादर करावे लागेल. त्यासाठी, आपण स्वीकारता की Google च्या इंजेक्टिव्ह उपायांसाठी (किंवा त्या त्वरित कायदेशीर कारवाई प्रकारासाठी) आपण कोणत्याही अधिकार क्षेत्रात अर्ज करू शकाल.
15 ऑगस्ट 2008